ONLINE WARKARI GURUKULAM
ऑनलाईन वारकरी गुरुकुलम्

॥राम कृष्ण हरी ॥ 🙏🏻
॥ मस्तक माझा पायावरी । या वारकरी संतांच्या ॥
वारकऱ्यांचं आपल्या आयुष्यात किती मोठे योगदान आहे. आज २१ व्या शतकात आपण जी मराठी भाषा बोलतो ती श्रीज्ञानोबारयांची श्रीतुकोबारायांची सकल संतांची ही मराठी आहे ,एवढेच नाही तर ७०० ते ८०० वर्ष पारतंत्र्यात राहूनही ज्या वारकऱ्यांमुळे ही मराठी भाषा कणखर व टाळ मृदुंगाच्या गजरात शृंगार ,करूणा ,आनंदादी रसाने अलंकृत राहिली ,श्रीविठ्ठलाच्या अमृतमय भजनाने अजरामर झाली. त्याच गाथा-ज्ञानेश्वरीच्या, संत वाङ्मयाच्या सेवेसाठी आपण एकत्र येऊ. संत हे आधि वारकरी होते मग संत झाले आपण ही श्रीज्ञानोबाराय व श्रीतुकोबाराय यांचे वारकरी होऊया व देव देश धर्माची सेवा करण्यासाठी एकत्र येऊया… प्रमुख उद्दिष्ट – युवकांना व पुढील पिढीसाठी आपली चालत आलेली हजारो वर्षांची परंपरा जतन करणे त्या माध्यमातून संत साहित्य स्त्री पुरुषांना शिकवणे व पांडुरंगाचे वारकरी असलेले ज्ञानोबाराय तुकोबाराय आदि संत यांच्या मार्गाने आपणही वारकरी म्हणून चालणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट आहे.
या रे या रे लाहान थोर । याति भलती नारीनर ।
करावा विचार | न लगे चिंता कोणासी ॥
अभ्यासक्रम व काय शिकायला मिळणार
आधुनिक शिक्षण पद्धती द्वारा व पारंपारिक गुरुकुल पद्धतीप्रमाणे आपण ज्ञानार्जन करणार आहोत
Level 1 – श्रीमद्भागवत गीता
यामध्ये संस्कृतचा परिचय गीता नमन गीता संहिता श्लोकांचे शुद्ध उच्चारण
Level 2 – ज्ञानेश्वर महाराजांचा व एकनाथ महाराजांचा हरिपाठ, संत चरित्र मनन.
Level 3 – वारकरी तत्त्वज्ञान, चांगदेव पासष्टी, चिरंजीव पद, व विचार सागर
Level 4 – गाथा – ज्ञानेश्वरी तत्वर्थ , सकल संत अभंग गाथा चिंतन
विद्यार्थ्यास अभ्यास साहित्य
१) ग्रंथ पीडीएफ मध्ये उपलब्ध करून दिले जातील
२) शिकवलेले पाठ ऑडिओ रेकॉर्डिंग स्वरूपात पाठवले जातील आणि पाठ गुगल मिट वर होतील
३) लहान वयोगटातील मुलांसाठी पीपीटी मार्फत शिकवले जाईल
४) ऑनलाईन वारकरी गुरुकुलचे प्रत्यक्ष एक दिवसाचे शिबिर सहा महिन्यातून एकदा होईल.
५) एक दिवसीय शिबिरामध्ये गुरुकुल मधील विद्यार्थ्यास level पूर्ण केलेल्यास प्रमाणपत्राने सन्मानित केले जाईल.
ऑनलाइन वारकरी गुरुकुलमध्ये प्रवेश घेण्यासाठी
१) प्रथम www.usowarkari.org या लिंक वर जाऊन ऑनलाईन वारकरी गुरुकुल प्रवेश अर्ज यावर क्लिक करा
२) प्रवेश अर्ज यामध्ये आपले नाव व त्याबरोबर सर्व माहिती भरावी
३) सर्व माहिती भरल्यानंतर शेवटी सेवा शुल्क १०८ प्रति महिना गुगल पे किंवा इतर पर्याय उपलब्ध आहेत त्याद्वारा भरावे
४) आणि शेवटी सबमिट ( submit) बटन दाबावे. त्यानंतर आपल्याला व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी केले जाईल
पुढील सूचना व्हाट्सअप ग्रुपवर मिळतील.